Skip to main content

चंदूचा मेंदू आणि शंभर शक्यता.

वयाच्या पहिल्या दहाबारा वर्षांमधे वाचनाची आवड लागली नाही तर त्यानंतर त्याची शक्यता खूप कमी होत जाते.
मराठी शाळांमधील मुलांना वाचनाची आवड लागावी ह्यासाठी जे प्रयत्न होत असतात ते समजून घेणे आणि त्याबाबत नवीन उपक्रम व प्रकल्प करणे हा माझ्या आवडीचा व काही प्रमाणात कामाचाही भाग आहे.
प्रयोगशील आणि पर्यायी शिक्षणातील काही निवडक पद्धती व विचार औपचारिक शिक्षणात कशा रुजवता येतील ह्याबाबत समजून घ्यायला मला आवडतं.
भाषाशिक्षण, विज्ञानशिक्षण व कार्यानुभव अशा विषयांचा मिलाफ प्राथमिक शाळेत झाला पहिजे हा असाच एक पर्यायी शिक्षणातील विचार आहे. तो बहुतेक मराठी शाळांमधे रुजलेला नाही.
मराठी शाळांबाबत इतरही बऱ्याच अडचणी आणि गोंधळ आहेत. मागील पंधरा वर्षे मी पालक व शिक्षकाबंरोबर शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही काम करतो आहे.
ह्या विषयावरचा एक लेख मी २०१५सालच्या पालकनीती दिवाळी अंकात लिहिला होता. तो खालील दुवा वापरून वाचता येईल.

चंदूचा मेंदू आणि शंभर शक्यता ह्या लेखाचा दुवा (लिंक)

Comments

Popular posts from this blog

फोर्टफेरी

☀ दक्षिण मुंबईतली एक संध्याकाळ. चाकरमानी लोक आजची नोकरी करून इमानदारीत घरी चालले आहेत. महानगराच्या भव्य,डौलदार वास्तूंभोवती तिन्हीसांजा मिळून येत आहेत. मी निरुद्योगी, रिकामटेकडा, भणंग वगैरे. चाकरमान्यांच्या उलट दिशेने जात जात भटकतोय. व्हिटीपासून निघून लांब फेरी मारून परत व्हिटीलाच येणारी बस. संथगतीने जातेय. बसमधून मी मजेत बघतोय फोर्टमधली माणसे, दुकाने आणि इमारती. संधीप्रकाश आणि वीजेच्या दिव्यांच्या प्रकाश. मिसळण झाली आहे. असं रात्री, मुंबईत बेस्ट बशीतून आरामात फिरताना मस्तच वाटतं हे मला लहानपणी जाणवलं होतं. इतकी दशके झाली तरी अजूनही आवडतय. म्युझियमजवळ पोचलीय बस. हिवाळ्याचे दिवस. हवेत छान गारवा आहे. कंटक्टरबुवासुद्धा छान मूडमधे बोलताहेत पब्लिकबरोबर. अशा हवेत चालत, चालत फिरूया असं वाटून मी बसमधून उतरलो. रीगलपासून गेटवेला व तिथून पुढे ताजच्या समोरून भटकंती. समोर समुद्राच्या काळ्या पाण्यात रंगीत, हलती प्रतिबिंबे. होड्यांवरील दिव्यांचे चमचमणारे रंग. डावीकडे कोपऱ्यात गेटवेची मॅजेस्टिक कमान. मागे ऐश्वर्यसंपन्न ताज. सगळ्या भवतालात ब्रिटिशकालीन बॉम्बेचा संमोहक राजसपणा.